शबनम न्युज | पुणे
पुणे येथील राजगुरुनगर मध्ये एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत खेड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. मृत तरुण हा बहिणीची छेड काढतो, आईला अश्लील भाषेत बोलतो, या कारणावरून सदर हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. स्वप्निल अशोक इंगोले (वय २२, रा. मोशी, ता. हवेली) असे मृत तरुणाची नाव आहे.
शुभम अजय कांबळे (वय २४), सिराज अब्दुल सलाम (दोघेही रा. भीम नगर लक्ष्मी नगर, मोशी, ता. हवेली) व त्यांच्यासोबत इतर तीन विधी संघर्षित बालक यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल याचा आठ दिवसांपूर्वी चांडोली येथील फळ उत्पादन रोपवाटिकेत खून झाला होता. गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा हाती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्या ठिकाणाची पोलिसांनी बारकाईने पाहणी केली, परंतु खून केलेला गुन्हयाचा उलगडा होण्यासाठी कोणताही पुरावा त्या ठिकाणी मिळून आला नाही. त्यामुळे खून झालेला इसमाचा त्याचे वारसांचा व आरोपीचा शोध घेणे कठीण होते. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्र यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तयार करून गोपनीय बातमीदारांमार्फत पोलिसांनी माहिती काढून धागेदोरे शोधत आरोपीना अटक केली तसेच तपासा दरम्यान बहिणीचे छेड काढल्याने व आईला अश्लील भाषेत बोलण्याचा राग मनात धरून स्वप्निल याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस हवालदार पुनाजी जाधव, शंकर भवारी, संतोष मोरे, विजय राहतेकर, प्रवीण गेंजे, सुनील बांडे, संतोष कंठाळे, योगेश भंडारे,सागर शिंगाडे यांनी केली.