अरुण पाडुळे स्पोर्ट्स फौंडेशन मधील साइराज नवनाथ पारखी व वेदांत वसंत बाबर यांची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड तर अनुष्का बाबर ला युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक.
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
नॅशनल रायफल असोसिएशन, दिल्ली . आयोजित पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा ही कलकत्ता येथील असनसोल येथे आयोजित करण्यात आली ,या स्पर्धेत भारतातील सर्व राज्यातून विविध गटातील हजारो पिस्तुल व रायफल नेमबाजांनी सहभाग नोंदवला .
पिंपरी चिंचवड च्या आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट फौंडेशन नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील साइराज नवनाथ पारखी सब युथ गटात 400 पैकी 347 व वेदांत वसंत बाबर सब यूथ गटात 400 पैकी 349 गुण मिळवत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केला असून यामुळे पिंपरी चिंचवड च नाव नेमबाजी मध्ये आता सतत पुढे येत आहे.
खडकी येथे झालेल्या युनिव्हर्सिटी स्पर्धेत अनुष्का बाबर हिने 10 मीटर पिस्तुल प्रकारात 400 पैकी 373 गुण मिळवत सुवर्णपदक ची कमाई केली. सर्व स्तरातून या खेळाडूंचे कौतुक होत आहे.
हे सर्व खेळाडू हे अरुण पाडुळे स्पोर्ट फाऊंडेशन चे प्रमुख प्रशिक्षक अरुण पाडुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत आता पर्यंत अरुण सर पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 25 राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत ..पाडुळे सर स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून पिंपरी चिंचवड मधून नेमाबाजीत जास्तीत जास्त खेळाडू हे सहभागी होऊन राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर पिंपरी चिंचवड च नेमाबाजीत नाव मोठं करण्या साठी प्रयत्न करीत आहेत.