शबनम न्युज | मुंबई
आमदार अपात्रतेवर उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार होती, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदर सुनावणी 13 ऐवजी 12 तारखेला होणार असल्याची माहिती दिली.
शिवसेना, राष्ट्रवादीच्या भाजपासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेकडे विरोधकांचे लक्ष लागून आहे, तर सत्तेत असलेले आणखी काही दिवस कसे मिळतील, याची मार्ग शोधत आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुद्दामून निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे, यावरही एकत्र सुनावणी घेण्यात.
Advertisement
13 तारखेला सर्वोच्च न्यायालयात देखील ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकेवर वर सुनावणी घेतली जाणार आहे. परंतु दिल्लीतील टी-20 च्या नियोजित कार्यक्रमामुळे विधानसभेतील सुनावणी 12 तारखेला घेणार असल्याचे कारण नार्वेकरांनी दिले आहे.