शबनम न्युज | देहूगाव
देहूच्या नगराध्यक्षपदी पूजा दिवटे तर उपाध्यक्षपदी सुधीर काळोखे यांची एकमताने निवड करण्यात आली. शुक्रवारी नगरपंचायतीत निवडी झाल्या. सचिन कुंभार आणि प्रदीप परंडवाल यांना स्वीकृत नगरसेवक पदी संधी मिळाव्याचे पिठाचे अधिकारी संजय आसवले यांनी जाहीर केले.
देहूनगरपंचायतीत पहिले नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. त्यावेळी तडजोड आणि वाटाघाटीनुसार प्रथम नगराध्यक्षा म्हणून स्मिता चव्हाण यांना मान मिळाला. चव्हाण यांचा कार्यकार संपुष्टात आल्यानंतरही त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांनी त्यांच्यावर मनमानी कारभाराचा व आर्थिक अपारदर्शकता ठेवत असल्याचा ठपका ठेवला. या सदस्यांनी अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. परंतु आमदार सुरेश शेळके यांनी या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन तोडता काढला. लगेच दुसऱ्या दिवशी चव्हाण यांनी राजीनामा सादर केला. त्याचवेळी अविश्वासाचा ठराव मागे घेण्यात आला.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगराध्यक्षपदी पूजा दिवटे आणि उपास उपनगराध्यक्षपदी सुधीर काळोखे आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रदीप परनवार आणि सचिन कुंभार यांची निवड करण्यात आली. सायंकाळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगर अध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची ढोल ताशा आणि डीजे तालावर भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.