शबनम न्युज | पिंपरी
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने उद्योजक बैठक आयोजन करण्यात आली होती. या बैठकीचे प्रमुख अभय भोर हे होते. आयोजित बैठकीत बोलताना श्री अभय भोर यांनी उद्योजकांनी चौथ्या औद्योगिक क्रांतीस सामोरे जावे 4.0 इंडस्ट्रीज मुळे अनेक उद्योगांमध्ये आधुनिकरण आले आहेत आणि या आधुनिकरणाला समजून घेणे आवश्यक असून पुढील काळात आपल्या उद्योगांमध्ये प्रगती करण्यासाठी ऑटोमेशन रोबोट टेक्नॉलॉजी ई वेकल्स निर्मिती सारखे बदल घडवून जागतिक स्पर्धेत उद्योजकांना टिकाव धरण्यासाठी आधुनिकतेला सामोरे जावे लागेल, एम.आय.डी.सी क्षेत्रात आज अनेक परराष्ट्रीय कंपन्या आलेल्या असून या कंपन्यांना पुरवठा करण्यासाठी उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञान असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात रोबोटिक मशनरी आणि ऑटोमेशन केल्यास पुढील काळामध्ये आपल्या प्रोडक्शन मध्ये ऍक्युरेसी आणि पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवता येऊ शकते आणि रिजेक्शनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल जर प्रत्येक उद्योजकाने आधुनिक तंत्रज्ञानाने उद्योगांमध्ये प्रगती करण्याचे ठरविले.
तर पुढील काळामध्ये आपण जागतिक स्पर्धेत धरू शकू अनेक उद्योगांमध्ये आज विविध प्रकारचे डिझाईन करण्यासाठी कंपन्या उतरल्या असून नवीन प्रोडक्स बनविताना आधुनिक डिझाईनच्या माध्यमातून करणे गरजेचे असते स्टार्ट अप मध्ये अनेक नव तरुणांनी पदार्पण करावे तसेच शासनाच्या विविध योजनांचा उद्योजकांनी लाभ घेणे महत्त्वाचे असून त्यासाठी असोसिएशन तर्फे उद्योजकांना पूर्णतः सहाय्य करण्यात येणार आहे.
यावेळी कंपनीने उद्योजकांना येणाऱ्या आधुनिक काळातील बदल विषयी आणि डिझायनिंग क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योजकांना असोसिएशनच्या सभासद आर्कंन्स इंडीया कंपनीतर्फे सतीश जाधव शिरीष यादव यांनी डिझायनिंग क्षेत्रात संपूर्ण सहाय्य करण्यात येणार असल्याचे सांगितले प्रवीण पवार आणि सहकाऱ्यांनी येणाऱ्या आधुनिकीकरणांमध्ये डिझाईन क्षेत्रामध्ये कोणते बदल घडून येतील याबाबत माहिती दिली. तसेच स्पार्क इंडिया इन्शुरन्स इलेक्ट्रो न्यूमॅटिक कायनेटिक ग्रीन कॉलिटी कंपोनंट्स श्री साई इंटरप्राईजेस सीड्लर फार्मा सॉलिडस प्रायव्हेट लिमिटेड डेक्कन मेकॅनिकल इंजिनिअरिंग यासारख्या अनेक पिंपरी चिंचवड आणि चाकण भागातील कंपन्या चे मालक आणि प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्य संख्येने उद्योजक उपस्थित होते उद्योजकांचे स्वागत फोरमचे उपाध्यक्ष वैभव जगताप यांनी आलेल्या सर्व उद्योजकांचे आभार व्यक्त केले.