कोरोना लसीसाठी आ.अण्णा बनसोडेंनी दिले २५ लाख लसीकरणासाठी आमदार निधी देणारे पहिलेच आमदार
ऑनलाईन लसीकरणाच्या अडचणींवर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंचा उतारा पिंपरी,ता.७ःपिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोना लस खरेदीकरिता आज दिला. लसीकरणासाठी आमदार निधी देणारे ते शहरातील पहिलेच आमदार आहेत. शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र बसविण्यासाठी मार्च महिन्यात सव्वा कोटी रुपये आपल्या आमदारनिधीतून आ. बनसोडे यांनी दिले आहेत....