जागतिक पुस्तक दिन विशेष लेख
शाळा बंद असल्यामुळे पुस्तके दुरावले
२३ एप्रिल २०२१: गेल्या दोन सत्रांपासून कोव्हीड-१९ च्या महामारी मुळे मुलांना शाळा नाही, गुरूजीची छडी तर दुरच; आभ्यासाचा साधा धाक नाही. विद्यार्थी आणि पुस्तकाच नात कसे फुलवायच यांचे संस्कार दुरावले. शाळा बंद असल्याने अभ्यासाचे नियोजन नाही, गुणवत्ता ठरविण्यासाठी परिक्षा नाहीत. यात पुन्हा “सोन्यावर सुहागा” म्हणजे विद्यार्थींना सरसकट पास करून पुढील वर्गात प्रवेश द्या! सरकार कडून शाळांना आदेश. या सर्व परिस्थितीत मुलांना पुस्तकांची आवड लागणार तरी कशी?…. खरं तर पालकांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होत आणि त्यांनी शक्यतो प्रयत्न केला हे सत्य असले तरी, मुलांमध्ये बौद्धिक विकासाची कसर पुर्ण झाली नाही; हे ही सत्य आहे.
देशाताची भावी पिढी म्हणजे प्रत्येक घरातील बाल वर्ग; हा आज मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकून पडला आहे. हल्ली मुलांमध्ये खेळण्यावरून नाही तर मोबाईल मुळे दररोज भांडणे होतांना पाहायला मिळतात. काही पालकांना देखील मुलांना पाटी-पुस्तक देऊन जवळ बसविण्यापेक्षा मोबाईल देऊन गप बसवने सोयीचे वाटत. हे सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर आई-वडिलांनीच आपल्या मुलांना मोबाईल साठी लाडावून ठेवण्यासारखे आहे.
किमान जोपर्यंत बाहेरील परिस्थिती सुरळीत होत नाही, मुलांना शाळेतून शिक्षण मिळत नाही तोपर्यंत तरी घरातच शाळा भरवण्याची जवाबदारी पालकांनी आपल्या दैनंदिनीत समाविष्ट करायला हवीत. पाटी-पुस्तकाशी नात वाढवण्यासाठी दररोज वाचन आणि लेखनाचा सराव मुलांकडून करून घ्यायला हवा.
“वाचाल तर वाचाल” या उक्ती प्रमाणे आज २३ एप्रिल म्हणजे जागतिक पुस्तक दिवसाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देत असतांना आपण स्वतः पुस्तक वाचण्याचा आणि भावी पिढी मध्ये पुस्तकांची बीजे रुजवली तर खर्या अर्थाने पुस्तक दिवस सार्थकी लागेल.
– सुमीत अंबेकर