शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील दत्तवाड़ी विट्ठलवाड़ी विवेकनगर भाजी मंडई परिसर तुळजाई वस्ती या भागातील मोकाट कुत्रांचा बंदोबस्त करा, अशी मागणी संस्थापक/अध्यक्ष विठ्ठल प्रतिष्ठाण,निखिल दळवी यांनी पशु वैद्यकीय अधिकारी पशु वैद्यकीय विभाग पि.चिं.मनपा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १४ मधील दत्तवाड़ी विट्ठलवाड़ी विवेकनगर भाजी मंडई परिसर तुळजाई वस्ती या भागत मोठया प्रमाणात मोकाट कुत्री फिरत आहेत रासत्यानी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चावत आहेत संपूर्ण परिसरात कुत्र्या न मुळे नागरिकांन मधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री प्रत्येक भागात कुत्री घोळक्याने वावरत असतात यरणाऱ्या जाणाऱ्या गाडीयां न माघे धावत असतात या मुळे कितेकदा अपघात देखील झाले आहेत विट्ठल मंदिर चौक भाजी मंडई दत्तवाड़ी मेन रोड या ठिकाणी रात्री चे नागरिकांचे दुचकि वरुण फिरने कुत्र्यनी मुश्किल केले आहे रात्री चे दुचकि मागे कुत्री लागत आहेत अश्या बरच्या ठिकाणी लहान मुले देखील खेलत असतात त्यांना ही कुत्री चाऊ शकतात या आधी लहान मुलाना मोकाट कुत्री चावल्याचा प्रकार देखील घडला आहे तरी आपणास विनंती आहे की प्रभाग क्रमांक १४ मधील सर्वच ठिकांच्या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावी, असेही दिलेल्या निवेदनात निखिल दळवी म्हंटले आहे.