शबनम न्यूज : देहूगाव (दि.१९ जानेवारी) :- देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देहू नगरपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली. 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दोन अपक्षांनी निवडणुकीत बाजी मारली.
आमदार सुनिल आण्णा शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देहू गावात प्रचाराचा धुराळा उडविल्याने निवडणूक अंत्यत चुरशीची झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मोठी आघाडी घेत विजयांचे संकेत दिले होते. आजच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविलेल्या या एकतर्फी विजयाचा तालुक्यात सर्वत्र जल्लोष सुरु झाला आहे.
देहू नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांमध्ये एक उत्सुकता होती. एकूण 17 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात होते. त्यातून आता राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला आहे. तर दुसरीकडे अपक्षांनी 2 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे आता देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालची आणि भंडाऱ्याची उधळण करत एकच जल्लोष केला आहे.
विजयी, पराभूत उमेदवार आणि मिळालेली मते
प्रभाग क्रमांक 1– मीना कुऱ्हाडे, (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस, पडलेली मते. 638, नरेंद्र कोळी (पराभूत) भाजपा- पडलेली मते 217
प्रभाग क्रमांक 2- रसिका काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 733, शितल मराठे (पराभूत) भाजपा पडलेली मते 181.
प्रभाग क्रमांक 3- पूजा दिवटे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 372, शैला खंडागळे पराभूत(शिवसेना) पडलेली मते 103.
प्रभाग क्रमांक 4- मयूर शिवशरण (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 289, प्रणव कसबे (पराभूत) भाजप- पडलेली मते 171
प्रभाग क्रमांक 5– शितल हगवणे(विजयी) अपक्ष- पडलेली मते 256, अभिजित काळोखे (पराभूत) पडलेली मते 172.
प्रभाग क्रमांक 6– पूनम काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 467, योगिता काळोखे(पराभूत) भाजपा- पडलेली मते- 266
प्रभाग क्रमांक 7– योगेश काळोखे (विजयी) अपक्ष- पडलेली मते. 650, विकास कंद (पराभूत) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 579,
प्रभाग क्रमांक 8– पूजा काळोके (विजयी) भाजपा- पडलेली मते- 307, अक्षता कंद (पराभूत) शिवसेना- पडलेली मते- 214.
प्रभाग क्रमांक 9- स्मिता चव्हाण (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 568, स्वाती संतोष चव्हाण (पराभूत) भाजपा- पडलेली मते- 235
प्रभाग क्रमांक 10– सुधीर काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 571, सुहास गोलांडे (पराभूत)- पडलेली मते- 80.
प्रभाग क्रमांक 11– पौर्णिमा परदेशी(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस, पडलेली मते-288, अनिता मोरे(पराभूत)भाजपा- पडलेली मते. 243
प्रभाग क्रमांक 12– सपना मोरे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 360, सिंधूबाई मोरे(पराभूत) भाजपा- पडलेली मते. 204.
प्रभाग क्रमांक 13– प्रियंका मोरे(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 625. अनिता मुसुडगे(पराभूत)भाजपा- पडलेली मते- 97,
प्रभाग क्रमांक 14– प्रवीण काळोखे(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस पडलेली मते- 318, आनंदा काळोखे (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 311
प्रभाग क्रमांक 15– आदित्य टिळेकर (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 630. प्रफुल्ल टिळेकर (पराभूत) भाजपा- पडलेली मते- 395,
प्रभाग क्रमांक 16– योगेश परंडवाल (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 503, सचिन विधाटे- (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 228,
प्रभाग क्रमांक 17– ज्योती गोविंद टिळेकर (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते. 475, सुनिता टिळेकर (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 262.