शबनम न्यूज : आळंदी (दि.१४ मार्च) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी या ठिकाणी स्टाफ वेल्फेअर अँड स्टाफ डेव्हलपमेंट व रिसर्च अँड डेव्हलपमेंट समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन पेपर कसा लिहावा’ या विषयावर एक दिवसीय संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी वरील विषयाला न्याय देताना संशोधन पेपर कसा तयार करावा, पेपर तयार करताना कोणता विषय निवडावा, संशोधन पेपरसाठी कोण कोणते घटक महत्त्वाचे आहेत,संशोधनासाठी गृहितके कोणते आणि कसे निवडावेत, संशोधनासाठी संदर्भ ग्रंथांचा कसा उपयोग करावा,एकदा लिहिलेले वाक्य परत लिहिले जाणार नाही. याची कशी काळजी घ्यावी यासंदर्भात पीपीटी द्वारे सविस्तर माहिती स्व अनुभवानुसार दिली. याप्रसंगी खुल्या पद्धतीने प्रश्न आणि त्यांची उत्तरे याची सविस्तर चर्चा झाली.
या कार्यशाळेसाठी मा. श्री. मयूर ढमाले खजिनदार – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या शिबिराला प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, प्रा. शाहूराज येवते, प्रा.विकास दिघे, प्रा. दिलीप बारी प्रा. शैला वाळुंज प्रा. डॉ. छाया जोशी, प्रा.प्रेरणा पाटील प्रा. परमेश्वर भत्ताशे, प्रा. सोनाली अभंग, प्रा.सविता मानके, प्रा.करिष्मा सातपुते, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. डॉ. राजू शिरसकर, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. प्रविण डोळस इत्यादी सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रणजीत कदम यांनी केले आणि उपस्थित मान्यवर मार्गदर्शक व सर्व प्राध्यापक यांचे आभार कला शाखा प्रमुख प्रा.कैलास अस्तरकर यांनी मानले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.