शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरांच्या संपर्क कार्यालयामध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने ध्वजारोहण करून भारतीय तिरंगा मानवंदना देण्यात आली.
आम आदमी पार्टीच्या आकुर्डी संपर्क कार्यालयात आमचे पिंपरी चिंचवड चे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री विठ्ठल रामचंद्र काळभोर, विश्वस्त खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक वाल्मीक बेंद्रे, माजी सैनिक दस्तगीर बक्षुद्दीन मुल्ला, किसन तात्या काळभोर सामाजिक कार्यकर्ते, अण्णासाहेब कुराडे अध्यक्ष आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटना आणि सदस्य, विष्णुपंत गुल्हाने अध्यक्ष जनहित ज्येष्ठ नागरिक संघ आणि सदस्य, भगवान बडगुजर अध्यक्ष विघ्नहर्ता जेष्ठ नागरी संघ आणि सदस्य, संपत शिंदे अध्यक्ष शिवशक्ती पतसंस्था, ज्ञानेश्वर ननावरे, प्रकाश परदेशी, अन्सारी काका, मोहन जाधव, चंद्रमणी जावळे, गंगाधर चौधरी, वसंत सोनार, ठोंबरे काका, एकनाथ पाठक, नारायण भोसले, रमेश तराळ, रमेश बनसोड, बबन सुतार, अनिल पाटील आधी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
त्याचप्रमाणे साईनगर, मामुर्डी, येथील आप जनसंपर्क कार्यालयात साईनगर येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रम सोहळ्याला आमचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे, चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख संतोषी नायर, दिलीप सुर्यवंशी, वसंत नांगरे, वेंकटेश कोळी, लक्ष्मीकांत कटारे, प्रकाश हगवणे, स्वप्निल जेवळे, एकात्मिक बाल विकास सेवा अंगणवाडी साईनगर मधील लहान विद्यार्थी व गायकवाड मॅडम आणि साईनगर मधील रहिवासी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख श्री गोविंद माळी यांनी केले.