शबनम न्युज | पुणे
ट्रिनिटी पॉलिटेक्निक पुणे व इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (इडसा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर संघाने विश्वभारती पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट नांदेड संघाचा ४ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना सोलापूरच्या संघाने निर्धारित ८ षटकांत ६ बाद ७२ धावा केल्या. विजयासाठी ७३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या नांदेड संघाला ६८ धावा करता आल्या. सलामीवीर राजू राठोडने केलेली ३९ धावांची खेळी त्यांना विजय मिळवून देऊ शकली नाही.
येवलेवाडी येथील केजे शिक्षण संकुलाच्या क्रिकेट मैदानावर ८ ते १० डिसेंबर २०२२ या कालावधीत ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत आहे. स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील एकूण १४ विभागातील डिप्लोमाच्या विजेत्या संघांचा समावेश असून, नॉक आऊट पद्धतीने हे सामने खेळवले जात आहेत. ट्रिनिटी पॉलिटेक्निक पुणेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी व स्पर्धेचे समन्वयक प्रा. संतोष डोईफोडे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
Advertisement
स्पर्धेचे उद्घाटन केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. निलेश उके, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. अभिजित औटी, ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य बी. एस. केशव, ट्रिनिटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट रिसर्चच्या संचालिका डॉ. प्रीती शर्मा यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेतील सहभागी संघ :
श्रीयश पॉलिटेक्निक कॉलेज औरंगाबाद, गीता तटकरे पॉलिटेक्निक कॉलेज कोलाड, के. के. वाघ पॉलिटेक्निक नाशिक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर, विश्वभारती पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट नांदेड, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड, जी. एम. चौधरी पॉलिटेक्निक शहादा, सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पालघर, विवेकानंद पॉलिटेक्निक सीतासावंगी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अशोक इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक अशोकनगर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती.
संक्षिप्त धावफलक:okbet f1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर - (८ षटकांत) ६ बाद ७२ (पियुष पवार १६ चेंडूत २५, प्रणव गवळी १२ चेंडूत ११, जयेश हरळे २-१२, साई गायकवाड २-१५) विजयी विरुद्ध विश्वभारती पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट नांदेड (८ षटकांत) ३ बाद ६८ (राजू राठोड २४ चेंडूत ३९, लक्ष्मण कोमलवाड ११ चेंडूत १३, पार्थ जमादार १-८, लक्ष्मीकांत म्हमाणे १-९, प्रतीक कोल्ले १-२९)
Advertisement