शबनम न्युज | पुणे OKBET/a>
ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् तर्फे ‘युवा स्वरानुभूती’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजता कोथरूड येथील वेदभवन मागील ऋत्विक फाउंडेशनच्या सभागृहात युवा कलाकार यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन, तर अनुजा झोकारकर यांचे गायन होणार आहे. रोहित देव तबल्यावर यज्ञेश यांना, तर अजिंक्य जोशी तबल्यावर आणि मिलिंद कुलकर्णी संवादिनीवर अनुजा यांना साथ सांगत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. okbet playnow
प्रसिद्ध व्हायोलिन वादक स्वरप्रज्ञ पंडित मिलिंद रायकर यांचे पुत्र व शिष्य असलेले यज्ञेश वयाच्या चौथ्या वर्षांपासून व्हायोलिन वादन करत आहेत. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. मिलिंद रायकर यांच्यासह पंडित अरुण कशाळकर, व्हायोलिनचे बादशहा विद्वान डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्याकडे ते शिकत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, गोवा स्वरमंगेश महोत्सव अशा अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवात त्यांनी सादरीकरण केले आहे.
okbet casino
इंदोर घराण्याशी संबंधीत असलेल्या अनुजा प्रसिद्ध गायिका विदुषी कल्पना झोकारकर यांची कन्या व शिष्या आहेत. वयाच्या आठव्या वर्षांपासून अनुजा यांनी आई कल्पना यांच्या मार्गदर्शनात गायनास सुरुवात केली. आकाशवाणीवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय, गझल, भजन गायनात त्यांचा हातखंडा आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव यासह देशविदेशात विविध कार्यक्रमात त्यांनी सादरीकरण केले आहे. okbet pubg betting
तरुण पिढीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत आणि परफॉर्मिंग आर्टस् याबद्दल रुची वाढावी, या उद्देशाने ऋत्विक फाउंडेशनची स्थापना झाली. तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासह भविष्यातील कलाकार शोधून त्यांना सादरीकरणाची संधी देण्याचा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. याच भावनेतून युवा स्वरानुभूती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अधिकाधिक संगीतप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे ऋत्विक फाउंडेशनचे प्रवीण कडले यांनी सांगितले.OKBET BOXING BETTING