संपादकीय : रेहान हुसेन
सर्वसामान्य माणसांना पैशाची गरज नेहमीच असते, आपण आपले जीवन जगताना अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो आणि पैसे अभावी या आपल्या अडीअडचणी वाढत असतात, गरजवंत माणसाला पैशाची गरज असल्यास तो वेगवेगळे पर्याय शोधत असतो. या पर्यायातून गरजवंत माणूस हा नकळत अशा प्रकारचे कर्ज घेतो की ते कर्ज फेडल्यानंतरही त्याला पश्चाताप करावा लागतो, असाच एक प्रकार आहे गुगल प्ले स्टोअर ॲप वर अनेक कर्ज देणारे ॲप आहेत. काही प्रामाणिक कर्ज देणारे ॲप म्हणजे आरबीआय रजिस्टर असतात या ॲप मधून कर्ज घेतल्यास व वेळेवर कर्ज फेडल्यास कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला सहन करावा लागत नाही. परंतु गुगल प्ले स्टोअर ॲप वर असे बरेच ॲप आहे, जे फेक लोन ॲप आहेत, या फेक लोन ॲप मधून एखादा गरजवंत माणूस जेव्हा कर्ज घेऊन आपली गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हा गरजवंत माणूस त्या फेक लोन ॲपच्या जाळ्यात फसतो.
सध्या गुगल प्ले स्टोअर ॲप वर अनेक लोन देणारे ॲप आहेत. हे फेक लोन ॲप कमी रकमेचे कर्ज देणारे आहेत, आपण जेव्हा सदरचा ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपल्याला प्रथमतः ते वीस हजार ते 50,000 पर्यंतचे कर्ज मिळणार असल्याचे दर्शवितात. आपण या ॲपवर कर्ज घेण्यासाठी लॉगिन केल्यानंतर आपल्याला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड फोटो बँक अकाउंट हि महत्त्वाची कागदपत्रे मागितली जातात. यानंतर आपण कागदपत्र डाऊनलोड केल्यानंतर प्रोसेस मध्ये जातो प्रोसेस मध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसते की, सदर ॲप मधून आपल्याला पाच हजार ,सात हजार, दहा हजार पर्यंतचे लोन उपलब्ध आहेत. आपण जर पाच हजार रुपयासाठी सदर अप्लाय केल्यानंतर आपल्याला या ॲप मधून पाच हजार रुपये कर्ज देण्यात येणार असल्याचे दर्शविले जाते. परंतु आपल्या खात्यावर साडेतीन हजार रुपये किंवा तीन हजार दोनशे रुपये टाकले जातात व बाकीची रक्कम सर्विस फी म्हणून दर्शविली जाते. आपल्याला जास्तच गरज असल्याने आपण सदर लोन घेतो , हे लोन घेत असताना जी प्रोसेस असते त्या प्रोसेस मध्ये ते आपल्याकडून आपल्या मोबाईलचा डाटा कलेक्ट करण्याची परवानगी घेतात, आपणही मोबाईल मधील आपला डाटा म्हणजे आपल्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट नंबर, फोटो ,ॲप जे काही आपल्या मोबाईल मध्ये अस्तित्वात आहेत ते सगळे त्यांना कलेक्ट करण्याची आपण परवानगी देतो , त्यानंतरच सदर लोन आपल्याला मिळते हे लोन आपल्याला फक्त सात दिवसासाठी दिले गेलेले असते. आपण सात दिवस दिलेले साडेतीन हजार रुपये वापरतो परंतु या कर्जाची फेड सात दिवसात करताना आपल्याला पूर्ण पाच हजार रुपये द्यावे लागतात व आपण वापरतो फक्त साडेतीन हजार रुपये ! आपण कर्जाची परतफेड केल्यानंतरही या लोन ॲपचे रिकवरी एजंट आपल्याला त्रास देत असतात आपण कर्जाची परतफेड केल्यानंतरही ते परत परत आपल्याला कॉल करतात व आता तुमच्या कर्जातील एवढी एवढी रक्कम शिल्लक आहे ती भरावी, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. तुमच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणारे मेसेजेस तुमच्या संपर्कातील व्यक्तींना पाठविले जातील तसेच तुमचे काही फोटो अश्लील फोटो तयार करून ते तुमच्या संपर्कातील व्यक्तींना पाठविले जातील अशी धमकी देतात व परत एकदा पैशाची मागणी करतात व आपण जर ते पैसे दिले नाही तर ते आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील व्यक्तींना आपल्याबद्दल बदनामी करणारे मेसेजेस पाठवतात तसेच आपले काही फोटो कलेक्ट करून त्याचे अश्लील फोटो तयार करून ते पाठवतात तसेच हे रिकव्हरी एजंट आपल्याला वारंवार फोन करून धमकी देतात शिवीगाळ करतात व पैसे दिले नाहीत तर वेगवेगळ्या पद्धतीने बदनामी करण्याची धमकी देतात आपण पोलिसात तक्रार केली तरी हे रिकवरी एजंट परदेशी असतात त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे एक अवघड बाब झाली आहे. ते आपल्याला वारंवार कॉल करून तसेच वेगवेगळे मेसेज पाठवून आपली बदनामी करत असतात , अशा बदनामीकारक परिस्थितीत माणसाला मानसिक त्रास तर होतोच त्याचप्रमाणे बदनामी होत असल्याने माणूस हा खचून जातो त्यामुळे या गुगल प्ले स्टोअर ॲप वर जे काही फेक लोन ॲप आहे त्या फेक लोन ॲप पासून आपण सावध व्हायला पाहिजे.
आपण पोलिसात तक्रार केली असली तरी त्याचा जास्त काही फायदा होत नाही कारण हे रिकवरी एजंट आपल्याला ज्या फोन नंबर वरून फोन करतात मेसेज करतात ते नंबर परदेशी नंबर असतात, ते भारतातील नंबर नसतात त्यांना ट्रेस करणे खूपच अवघड असते, त्यामुळे त्यांना कायद्याची कोणतीही भीती नसते त्यामुळे आपण अशा लोन ॲप पासून लांबच राहिला हवे.
आपल्याला पैशाची जास्त गरज असेल तर गुगल प्ले स्टोअर ॲप वर आरबीआय रजिस्टर लोन ॲप उपलब्ध आहेत अशाच आरबीआय रजिस्टर असलेल्या लोन ॲप मधूनच आपण कर्ज घ्यावे, व त्याचीही वेळेवर परतफेड करावी, म्हणजे आपण आपल्या अडचणी दूर करू शकतो व समाधानी राहू शकतो परंतु जर आपण फेक लोन ॲपच्या नादी लागलं तर आपण त्यांच्या जाळ्यात अडकत जातो व आपल्याला फार मोठा मानसिक ताण त्रास सहन करावा लागतो या लेख द्वारे आमची आपणास विनंती आहे की, आपण कोणत्याही अशा फेक लोन ॲपच्या जाळ्यात अडकवू नये धन्यवाद…!
1 comment
YES