परभणी, – मुस्लिम धर्मासाठी हज यात्रा ही अत्यंत महत्त्वाची असते प्रत्येक मुस्लिम हज यात्रा करण्याचे स्वप्न बाळगत असतो प्रत्येकजण हज यात्रा करण्यासाठी पैशाची बचत करत असतो परंतु आता हज यात्रा करण्यासाठी शासनाच्या वतीने अतिरिक्त रक्कम वाढविण्यात आली आहे ही वाढवून दिलेली रक्कम मुख्यमंत्री निधीतून देण्याची मागणी परभणी येथील काँग्रेसचे पदाधिकारी सलीम पटेल वाहेगावकर यांनी केली आहे
पवित्र हजसाठी पैसे जमा करण्यासाठी अर्जदार मेहनत घेतात. त्यामुळे अचानक वाढलेली अतिरिक्त रक्कम भरणे अर्जदारांना शक्य होणार नसल्याने अनेक अर्जदार यात्रेपासून वंचित राहणार आहेत. मात्र, वाढीव रक्कम हज यात्रेकरूंना मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सलीम पटेल वाहेगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व हज यात्रेकरूंना राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून वाढीव रक्कम देण्याची मागणी केली आहे.
सलीम पटेल यांनी केलेल्या मागणीला सकारात्मकता मुख्यमंत्री यांच्या वतीने दाखविण्यात आली असून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाला याबाबत कळविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सलीम पटेल यांना ई-मेल द्वारे कळविण्यात आले आहे