शबनम न्यूज (पुणे ) प्रतिनिधी :
पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सुरळीत आगमन होण्यासाठी पुणे शहर पोलिस सज्ज असून, मिरवणुका निघताना भक्तांची प्रंचंड गर्दी रस्त्यांवर होणार आहे. त्यामुळे पुण्यातले काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहे.
वाहतूकीतले हे बदल सोमवारी पहाटे 2 वाजल्यापासून नमूद केल्याप्रमाणे पालखी पुणे ओलांडेपर्यंत असेच असतील
संत तुकाराम पालखी बोपोडी चौकात पोहोचेपर्यंत:
बंद मार्ग : बोपोडी चौक ते खडकी बाजार.
पर्यायी मार्ग: चर्च चौक मार्गे अंतर्गत रस्ता.
बंद मार्ग : पोल्ट्री फार्म चौक.
पर्यायी मार्ग: रेल्वे पोलीस मुख्यालय, औंध रोड आणि ब्रेमेन चौक. (Ashadhi Wari)
तुकाराम महाराज पालखी इंजिनीअर कॉलेज चौकात पोहोचेपर्यंत
बंद मार्ग : जुना मुंबई पुणे रस्ता पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग : भाऊ पाटील रोड औंध रोड ब्रेमेन चौक.
बंद मार्ग : आरटीओ ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौक.
पर्यायी मार्ग: शाहीर अमर शेख चौक आणि कुंभार वेस. तसेच जहांगीर चौक, आंबेडकर सेतू मार्गे. (Pune)
बंद मार्ग: कळस फाटा ते बोपखेल फाटा.
पर्यायी मार्ग: अंतर्गत मार्ग वापरून धानोरी मार्गे.
बंद मार्ग: मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी जंक्शन.
पर्यायी मार्ग: जेल रोड आणि एअरपोर्ट रोड मार्गे.
बंद मार्ग : सदलबाबा चौक ते पाटील इस्टेट.
पर्यायी मार्ग: पर्णकुटी चौक ते गॅरिसन अभियंता चौक. (Traffic)
बंद मार्ग : रेंज हिल चौक ते संचेती चौक.
पर्यायी मार्ग: खडकी अंडरपास आणि पोल्ट्री फार्म चौक.
बंद मार्ग : खंडोजी बाबा ते वीर चाफेकर चौक
पर्यायी मार्ग : कर्वे रस्ता आणि सेनापती बापट रस्ता.