शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत असताना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे गट क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारे सफाई कामगार यांच्या वतीने ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या परिसरातील माजी नगरसेविका माजी शिक्षण समिती सभापती मनीषा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी मनिषा ताई पवार यांच्या वतीने या कामगारांना अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यावेळी मा. नगर सेविका शिक्षण सभापती सौ. मनीषा प्रमोद पवार, प्रमोद पवार, कांचन कुमार इंदुलकर साहेब, सचिन उघडे, दीपक चव्हाण, आबा कदम, सुनील लांडगे, कैलास भाऊ गोरखे, जितू दाखले, अनिल सूर्यवंशी, रूपालीताई खिलारे, कांबळे ताई आदी उपस्थित होते.
Advertisement