शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शहरातील पदपथ , मैदाने अशा ३४ ठिकाणी ओपन जिम ची संकल्पना राबवली आहेत तर शहरातील कार्यान्वित करण्यात आलेल्या ओपन जिमचा शहरातील नागरिक वापर करतात का हे आपल्या लक्षात घेण्यासाठी मनपाच्या वतीने पाहणी करण्यात यावी, राहूल कोल्हटकर ( संघटक – साद सोशल फाउंडेशन ) यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शहरातील पदपथ , मैदाने तसेच विविध ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ओपन जिम कार्यान्वित केली आहे. वास्तविक पाहता सदर ओपन जिमचा वापर नागरिकाच्या कमी प्रमाणात होत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी वापरा ऐवजी ती साधने खराब झाली आहे त्यांची दुरवस्था झाली आहे तसेच लहान मुले खेळण्यासाठी त्याचा वापर करत आहेत असे निदर्शनास आले आहे त्यामुळे शहरातील कार्यान्वित करण्यात आलेल्या ओपन जिम चा शहरातील नागरिक वापर करतात का हे आपल्या लक्षात येण्यासाठी मनपाच्या वतीने पाहणी करण्यात यावी याबाबत.
२. ओपन जिम च्या करिता खर्च करण्यात येणारा रुपये ७० लाख खर्च हा शहरातील मनपाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ८६ व्यायाशाळांमध्ये आधुनिक साहित्य किंवा साधन सुविधा वाढवण्याच्या करिता करण्यात यावा. जेणे करून खाजगी व्यायाशाळांमध्ये असणाऱ्या साधन सामग्री सारखी सुविधा मनपाच्या व्यायामशाळेत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी याबाबत.
३. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ओपन जिम करिता साहित्य खरेदी करण्यासाठी भांडार विभागाच्या वतीने निविदा प्रक्रिया पार न पडता दरकरार पद्धतीचा अवलंब केला आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना दरकरार पद्धतीचा अवलंब केला असल्याने यात निकोप स्पर्धा न होता मर्जीतील पुरवठाधारक यांच्या करिता सदर खरेदी केली जात आहे अशी शंका निर्माण झाली असल्याने सदर कामाच्या करिता अवलंबण्यात आलेली दरकरार पद्धत रद्द करून सदर कामाच्या साठी नवीन निविदा प्रक्रिया राबंविण्याचे आदेश संबधित विभागास देण्याबाबत.
४. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या भांडार विभागाच्या वतीने मागील वर्षी ही ओपन जिम करिता साहित्य खरेदी करण्यात आली होती पण काही कारणास्तव ती लवकर कार्यान्वित न होता हे साहित्य तसेच ठेऊन खराब झाले होते अशा पद्धतीच्या बातम्या शहरातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या त्यामुळे भांडार विभागाच्या कामाबाबत शंका निर्माण झाल्याने मागील वर्षीच्या ओपन जिम करिता जी साहित्य खरेदी करण्यात आली त्याची चौकशी करण्यात यावी याबाबत.सर्व प्रथम तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पदाचा कारभार आपण स्वीकारला त्याबाबत आपले हार्दिक अभिनंदन.
पिंपरी चिंचवड शहरातील युवक नागरिक यांचे आरोग्य व्यवस्थीत राहून त्यांना व्यायामाप्रती आवड निर्माण व्हावी याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शहरात ८६ व्यायामशाळा उभारण्यात येऊन त्याचे धोरण ठरवण्यात आले आज शहरातील अनेक युवक यांचा वापर करत आहेत. आज काही काही व्यायाम शाळा ह्या चांगल्या स्थितीत तर काही काही व्यायाशाळांमध्ये साहित्य व साधनाचा अभाव दिसून येत आहे. क्रीडा विभागाच्या क्रीडा साहित्य खरेदी करिता मनपाच्या वतीने अंदाजपत्रक तयार करून निधी देण्यात येऊन साहित्य खरेदी करण्यात येते पण एव्हढे असून सुध्दा काही काही व्यायाशाळांमध्ये साधनाचा अभाव आहे आज मनपाच्या वतीने ओपन जिम ही संकल्पना राबवली जात आहे शहरातील पदपथ , मैदाने तसेच विविध ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ओपन जिम कार्यान्वित केली आहे.
वास्तविक पाहता सदर ओपन जिमचा वापर नागरिकाच्या कमी प्रमाणात होत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी वापरा ऐवजी ती साधने खराब झाली आहे त्यांची दुरवस्था झाली आहे तसेच लहान मुले खेळण्यासाठी त्याचा वापर करत आहेत असे निदर्शनास आले आहे त्यामुळे शहरातील कार्यान्वित करण्यात आलेल्या ओपन जिम चा शहरातील नागरिक वापर करतात का हे आपल्या लक्षात येण्यासाठी मनपाच्या वतीने पाहणी करण्यात येऊन सदर ओपन जिम वर करण्यात येणारा नाहक खर्च बंद करण्यात यावा. शहरात एकूण ३४ ओपन जिम उभारण्यात आलेल्या आहे पण सर्व जिम करिता लागणारे जे साहित्य आहे त्याकरिता पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांना प्राप्त झालेली ७० लाख रुपये परतावा रक्कम महानगरपालिकेच्या कडे वर्ग करण्यात आले आहे ओपन जिम च्या करिता खर्च करण्यात येणारा रुपये ७० लाख खर्च हा शहरातील मनपाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ८६ व्यायाशाळांमध्ये आधुनिक साहित्य किंवा साधन सुविधा वाढवण्याच्या करिता करण्यात यावा. जेणे करून खाजगी व्यायाशाळांमध्ये असणाऱ्या साधन सामग्री सारखी सुविधा मनपाच्या व्यायामशाळेत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येऊन मनपाच्या व्यायामशाळेचा दर्जा सुधारला जाऊन लोकांना चांगल्या दर्जाचे साहित्य साधन सामग्री याचा वापर करण्यात येइल.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांना प्राप्त झालेली ७० लाख रुपये परतावा रक्कम महानगरपालिकेच्या कडे वर्ग करण्यात आले आहे ही रक्कम क्रीडा विभागातील क्रीडा व्यायाम साहित्य खरेदी या लेखाशीर्षकावर सुधारित अंदाजपत्रकात वर्ग करण्यात येणार आहे. त्यानुसार ओपन जिम साहित्य करिता पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना मध्यवर्ती साहित्य भांडार विभागाच्या वतीने निविदा प्रक्रिया दर करार पद्धतीने राबविण्यात येणार आहे. हे चुकीचे आहे. मोठ्या रकमेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना दरकरार पद्धतीचा अवलंब केला असल्याने यात निकोप स्पर्धा न होता मर्जीतील पुरवठाधारक यांच्या करिता सदर खरेदी केली जात आहे अशी शंका निर्माण झाली असल्याने सदर कामाच्या करिता अवलंबण्यात आलेली दरकरार पद्धत रद्द करून सदर कामाच्या साठी नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात येवून पारदर्शक पद्धतीने निविदा प्रसिद्ध करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन साहित्य खरेदी करण्यात यावी.
मा. आयुक्त साहेब , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या भांडार विभागाच्या वतीने मागील वर्षी ही ओपन जिम करिता साहित्य खरेदी करण्यात आली होती पण काही कारणास्तव ती लवकर कार्यान्वित न होता खरेदी करण्यात आलेले साहित्य तसेच एका ठिकाणी ठेऊन खराब झाले होते अशा पद्धतीच्या बातम्या शहरातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे सदर साहित्य नेमके कुठे बसविण्यात आले आहे किंवा त्यावेळी ज्या ओपन जिम कार्यान्वित करण्यात आल्या त्यांना
खराब साहित्यच बसविण्यात आले आहे. अशी शंका निर्माण झाल्याने मागील वर्षीच्या ओपन जिम करिता भांडार विभागाच्या वतीनेजी ओपन जिम करिता साहित्य खरेदी करण्यात आली त्याची चौकशी करण्यात येऊन त्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा तसेच सदर कामात काही गैरकारभार झाला असल्यास संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सदर निवेदनच्या माध्यमातून करण्यात येत आहे .
मा.आयुक्त साहेब , सदर निवेदनाच्या माध्यमातून आपण समोर मांडण्यात आलेल्या विषय याची दखल घेऊन ओपन जिमकरिता साहित्य खरेदी करिता लाखो रुपये खर्च करण्याऐवजी शहरातील ८६ व्यायाम शाळामध्ये आधुनिक साहित्य सुविधा वाढवण्याच्या करिता खर्च करण्यात यावे. पिंपरी चिंचवड शहरातील ३४ ओपन जिम ची पाहणी करून संबधित ओपन जिम बाबत सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभाग यांना त्वरित देण्यात यावे, असेही सदर निवेदनात कोल्हटकर यांनी नमूद केले आहे.